जे पी नड्डा यांच्या कार्यकाळात वाढ
Read Time:54 Second
नवी दिल्लीः
भारतीय जनता पक्षाने (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ दीड वर्षांनी जून २०२४ पर्यंत वाढवला आहे. २०२४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत जे पी नड्डाच अध्यक्षपदी असतील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या जोडीला नड्डा असतील.
राष्ट्रीय कार्यकारिणीने जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे, असे अमित शाह यांनी पत्रकारांना सांगितले. नड्डा यांचा कार्यकाळ २० जानेवारीला संपणार होता.
Related Posts
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%