नोकरभरती मंदावली
Read Time:1 Minute, 25 Second

आंतरजालावरून साभार
पुणेः
अमेरिकेत येऊ घातलेल्या संभाव्य मंदीचा फटका भारतातील आयटी क्षेत्राला बसत असून, येथील आयटी क्षेत्रातील नोकरभरतीत लक्षणीय कपात झाली आहे.
देशातील चार दिग्गज कंपन्यांमध्ये आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत केवळ १ हजार ९४० कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि विप्रो या कंपन्यांमध्ये झालेली नोकर भरती ही गेल्या २४ महिन्यांमधील सर्वांत कमी मानली जाते.
गेल्या २१ महिन्यांमध्ये या चारही कंपन्यांनी सरासरी ५३ हजार ४७ कर्मचारी भरती केले होते. त्या तुलनेत हे प्रमाण तब्बल ९६ टक्के इतके कमी आहे.
नव्या नोकरीच्या संधी कमी झालेल्या असल्याने पगारवाढीच्या अपेक्षाही कमी झाल्या आहेत, असे कंपनीतील एका अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्या सावधगिरी बाळगताना दिसून येत आहेत.