भाजपा प्रदेश माध्यम प्रमुखपदी नवनाथ बन

0 0
Read Time:1 Minute, 21 Second

मुंबईः
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश माध्यम विभाग प्रमुखपदी पत्रकार नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

गेल्या १५ वर्षांपासून बन हे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. दैनिक गावकरी पासून त्यांच्या पत्रकारितेतील कारकीर्द सुरु झाली. विद्यार्थी दशेत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले. बन यांना माध्यम क्षेत्राचा मोठा अनुभव असून, भारतीय जनता पार्टीची धोरणे, विचारधारा सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम ते करतील, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!