त्रिपुरामध्ये १६ तर मेघालय, नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान

0 0
Read Time:3 Minute, 28 Second

भाजपा निवडणुकीच्या प्रचार यात्रेचे संग्रहित छायाचित्र

नवी दिल्लीः

त्रिपुरा  विधानसभा निवडणूकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी, तर मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणूकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तिन्ही राज्यांमधली मतमोजणी 2 मार्चला होईल.

हवामानाची परिस्थिती, शैक्षणिक वेळापत्रक, बोर्ड परीक्षा, प्रमुख सण, संबंधित राज्यांमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची उपलब्धता, हालचाली, वाहतूक आणि वेळेवर सैन्य तैनात करण्यासाठी लागणारा वेळ आणि इतर संबंधित प्रत्यक्ष वास्तवाचे सखोल मूल्यांकन या सर्व संबंधित बाबी विचारात घेऊन निवडणूक आयोगाने मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक तयार केले आहे.

आयोगाने सर्व संबंधित बाबींचा विचार करून लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या संबंधित तरतुदींनुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यासाठी मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा राज्यांच्या माननीय राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, २७ फेब्रुवारीला या निवडणुका होणार आहेत. कसबा मतदारसंघात दिवंगत आमदार टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे. खासदार गिरीश बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे हे प्रबळ दावेदार आहेत. तर चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली गेल्यास या मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होण्याचा अंदाज आहे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!