
टीम राजमत
Read Time:1 Minute, 6 Second
स्पष्ट असूनही संयत,
असला रोखठोक तरी आक्रमक नाही.
एखाददुसरी शेलकी शिवी असली, तरी भांडणाची खुमखुमी नाही.
विश्वातल्या घडामोडींची खबरबात असली, तरी केवळ माझ्याकडेच उपाय आहे, असा अनाठायी दावाही नाही.
आज राजकारणाच्या धुमश्चक्रीतून नेमकं आणि नेटकं विश्लेषणासहित वाचकांपुढे मांडणारे वरिष्ठ पत्रकार श्री. संजीव ओक.
राजमत न्यूजचे मुख्य संपादक.
पत्रकारितेतला २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, महाराष्ट्राच्या मातीशी आत्मीयता जपणारा आणि जोपासणारा व्रतस्थ, अजातशत्रू सुहृद. सकारात्मक विचारांचा उगाता आणि प्रेरक मित्र.
असा बहुगुणी सद्सद्विवेकी पत्रकार राजमत न्यूजचा मुख्य संपादक आहे, याचा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे.
– टीम राजमत न्यूज
श्री राम समर्थ
राजमतच्या टीमला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या नेतृत्वामुळे विवेक आणि शुध्द अध्यात्माचे अधिष्ठान राजमतला प्राप्त झाले आहे.
आपण सद्गुरूंच्या कृपेने
अंगीकृत कार्यात कीर्तीसह यशस्वी व्हावे अशी प्रार्थना श्रीसमर्थांना
करतो.
श्रीसमर्थरामदासस्वामी आपल्या लेखणीद्वारे देशभर पुन्हा प्रकट व्हावेत ही मंगलकामना.
कल्याणमस्तु
श्रीराम
तुमचे मनापासून अभिनंदन
नमस्कार,
हार्दिक अभिनंदन
आपल्या प्रेरणादायी आणि उत्तम लेखन शैलीद्वारे ‘राजमत’
पत्रकारितेतील उच्चतम शिखर अखंड आणि यशस्वीपणे सर करत राहो ही सदिच्छा
आपले आणि ‘राजमत’ टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा