
सक्सेस पासवर्ड अर्थातच यशाची गुरूकिल्ली

प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करताना श्री. मेमाणे सर
वेळ – सोमवारी, सकाळी आठची
स्थळ – मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे
चित्रल वर्ल्डने आयोजित केलेल्या मोटिवेशनल स्पिचचे नाव होते, सक्सेस पासवर्ड. वक्ते होते हणमंतराव मेमाणे सर.
सकाळी ८ वाजून १० मिनिटांची वेळ होती, त्याप्रमाणे ठोक्याला त्यांचे मोटिवेशनल स्पिच सुरू झाले. महाराष्ट्राचे दैवत पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवले आहे. पुण्यात तिसऱ्या वाक्याला हशा किंवा टाळ्या नाही मिळाल्या तर फाऊल मानतात. संभाषण कौशल्याचे धडे देणाऱ्या मेमाणे सर यांनी अर्थातच तो होऊ दिला नाही. कार्यक्रम यशस्वी झाला, हे वेगळे सांगायची गरजच नाही.
त्यांनी सहाशेपेक्षा अधिक कार्यक्रम घेतलेत. १८ हजार यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत. उपस्थितांना काही घेण्याचे कोणतेही बंधन नाही. तसेच कशाची सक्तीही नाही. हे मला जाणवलेले कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे अन्य कोणाच्या सक्सेस स्टोरीज सांगून ऐकणाऱ्याच्या मनात कमीपणाची किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करणे नाही. त्यापेक्षा तूच एकमेवाद्वितीय आहेस, हे मेमाणे सर प्रत्येकाच्या मनात खोलवर बिंबवतात. आत्मविश्वास मजबूत हवा. त्याच्या जोडीला हेल्थ म्हणजेच आरोग्य चांगले हवे. नुसते शारीरिक आरोग्य नव्हे, तर मानसिकही चांगलेच हवे. अध्यात्माची बैठक हवी, कुटुंबात सर्वांचे परस्पर नातेसंबंध चांगले हवेत. हा पाया मजबूत असेल, तर मग पंचसुत्रीचा वापर करून यश खेचून आणता येते, हे जेव्हा ते सोदाहरणाने सांगतात, तेव्हा यश आपल्यापासून फार लांब नाही, असे उपस्थित प्रत्येकाला वाटते.
द अल्केमिस्ट या पाऊलो कोएलो या पुस्तकात विश्वाची अशी एक भाषा असते. तुम्ही बोललेल्या प्रत्येक शब्दाची विश्व नोंद घेत असते. त्यानुसार घटना घडत असतात. म्हणूनच नकारात्मक बोलायचे नाही, विचारही करायचा नाही, असे त्यात त्याने म्हटलेले आहे. मेमाणे सर यांचे बोलणे ऐकताना द अल्केमिस्टची आठवण अपरिहार्यपणे होते.
स्वप्रतिमा, स्वची पूर्नरचना, उद्दिष्ट्याची निश्चिती, ते पूर्ण करण्यासाठीची तीव्र इच्छाशक्ती आणि जपलेले स्नेहसंबंध यांचा प्रभावी वापर केला, तर यश मिळतेच, हे मेमाणे सर यांनी ज्या पद्धतीने सांगितले, ती एकमेवाद्वितीयच होय. सुमारे २.३० तास चाललेले हे मोटिवेशनल स्पिच जगण्यासाठीची आवश्यक ती सकारात्मक ऊर्जा देऊन जाते. प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरूवात होते. आणि यशाची गुरुकिल्ली उपस्थितांना देऊन त्याची सांगता होते. आपल्याला काय साध्य करायचे आहे, त्याची वारंवार स्वतःलाच आठवण करून देणे, स्वतःचे मूल्यमापन करणे, नकारात्मक विचारांना थारा न देणे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी ते ठळकपणे सांगतात. त्यांच्या १८ हजार यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक आहेत, राजकारणी आहेत, गृहिणी आहेत, विद्यार्थी आहेत, वेगवेगळे व्यावसायिक आहेत.
मेकॅनिकल इंजिनिअर असलेले मेमाणे सर यांनी चित्रल नावाने कार्यशाळा घ्यायला सुरूवात केली. कित्येक वर्षे ते हे काम करताहेत. देश-विदेशातून त्यांचे विद्यार्थी आजही त्यांच्याशी जोडलेले आहेत. सकारात्मक ऊर्जेची लोट ते देत राहतात. घेणाऱ्याने तो स्वतः घेऊन इतरांनाही त्याच्याशी जोडायचे आहे. की ऑफ गोल्डन फ्यूचर या नावाने ते एक नवा कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात आणत आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाला राजमत न्यूज टीमकडून हार्दिक शुभेच्छा!!!