“हसन भैय्याला १५८ कोटींचा घोटाळा मान्य”

“हसन भैय्याला १५८ कोटींचा घोटाळा मान्य,  ४९ कोटींचे बोगस बिल घेतल्याचा कबूल नामा”, असा आरोप भाजपा नेते  डॉ. किरीट सोमैया यांनी केला आहे. डॉ. किरीट सोमैय्या यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, हसन मुश्रीफ परिवाराने बोगस कंपन्या, बंद पडलेल्या कंपन्या, कोलकत्ता कंपन्या, बोगस बिल…..  द्वारा रुपये १५८ कोटी रुपयांचे मनी लाँडरिंग केले असल्याचे आता सिद्ध झाले आहे. हसन …

Continue Reading

बीबीसी माहितीपटाचे वार्तांकन करताना रॉयटर्सचा खोडसाळपणा

मुंबईः गोध्रा जळितानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बीबीसीच्या माहितीपटाचे प्रसारण भारतात रोखण्यात आले आहे. तसेच या माहितीपटाची कोणतीही क्लिप समाज माध्यमांद्वारे शेअर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या यासंबंधीच्या वृत्तात २००२ साली हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या रेल्वेला आग लागल्याने ५९ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हिंसाचार उसळला, असे नमूद करण्यात आले …

Continue Reading

डे ला रु कंपनीची होणार सीबीआय चौकशी (?)

नवी दिल्लीः भारतातील माजी वित्त सचिवाच्या आर्थिक कथित गैरव्यवहारप्रकरणी चलनी नोटांची छपाई करणारी कंपनी डे ला रुची सीबीआय चौकशी होऊ शकते, याची कल्पना असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. २०१६ पूर्वी (नोटाबंदी लागू होण्यापूर्वी) गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून, कंपनी याबाबत काहीही भाष्य करणार नाही. तथापी, भारतातील तपास यंत्रणांना योग्य ते सहकार्य करू, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच कोणत्याही गैरव्यवहारात सहभागी असल्याची …

Continue Reading

गुगल करणार १२ हजार कर्मचाऱ्यांना कमी

मुंबईः गुगलची पालक कंपनी अल्फाबेटने जगभरातून १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यासंदर्भात गुगल ब्लॉगवर मेल पाठवला आहे. अतिशय कठोर होऊन हा निर्णय घ्यावा लागत असून, त्याची संपूर्ण जबाबदारी आपण घेत असल्याचेही त्यांनी मेलमध्ये नमूद केले आहे. कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या दिग्गज टेक कंपन्यांमध्ये आता गुगलचेही नाव जोडले गेले आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्ट, मेटा …

Continue Reading

एअर इंडिया एअरबसकडून खरेदी करणार २३५ विमाने

दिल्लीः एअर इंडिया एअरबस या युरोपिय कंपनीकडून २३५ विमाने खरेदी करणार असून, यासंदर्भातील घोषणा २७ तारखेला केली जाईल, असे कंपनीतील उच्चपदस्थांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले आहे. एअर इंडिया ४९५ विमानांची खरेदी करणार आहे. हा विमान खरेदी करार अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी (दि. २७) यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकाच वेळी एखाद्या विमान कंपनीने एकत्रित २३५ …

Continue Reading

error: Content is protected !!